न्यूनगंड
कोणाला कधीच झाला नाही असं ह्या जगात कुणीच नाही पण मान्य करून त्यावर उपाय करणारे बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. रोज किमान एकदा तरी ह्या न्यूनगंडाचा आपल्या मनाला स्पर्श होतो असं म्हणायला हरकत नाही.
अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला इतरांचा हेवा वाटू लागतो. अश्या प्रसंगी काय करावे ते कळेनासे होते. तिथून पुढे आपल्याकडे दोन मार्ग असतात, पहिला असा की ज्या व्यक्तीकडून आपल्याला न्यूनगंड निर्माण होतो त्या व्यक्तिला अंतर देणे अथवा त्या न्यूनगंडाच्या भावनेला स्वीकारून त्यावर मात करण्यासाठी वाटचाल करणे. व्यक्तिला अंतर देणं हे पळवाट शोधण्याचं लक्षण आहे. पूर्वी सांगितल्या प्रमाणे सर्वांना ह्या न्यूनगंडाचा सामना करावा लागतो, पण फक्त मान्य करून त्यावर उपाय काढणारे माणसच आयुष्यात यशस्वी होतात.
कधी कधी आपण यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीला पाहतो आणि एक विचार डोकावून जातो की ' ह्याच्याकडे तर सर्व काही आहे, ह्याला न्यूनगंड येणे शक्य नाही'. परंतु सत्य परिस्थिती विपरीत असते. त्याला देखील संघर्ष करताना या न्यूनगंडाचा अनुभव आलेला असतो पण तो त्या भावनेला स्वीकारून त्यावर उपाय काढतो आणि पुढे जातो.
खरं तर, न्यूनगंड हा बाहेरून आलेला व्हायरस नसून स्वतःचा आत्मविश्वास डगमगत असल्याचा संकेत आहे . जेव्हा आपला आत्मविश्वास खंबीर होतो तेव्हा हेवा किंवा न्यूनगंडाऐवजी शिकण्याची इच्छा निर्माण होतो. हा एक लहानसा बदल आपल्याला एक नवीन दृष्टीकोन देतो.
शाळेच्या दिवसांपासून म्हातारपणीपर्यंत आपण ही भावना अनुभवत असतो पण ती भावना क्षणिक असून आपल्या मनावर त्याचा परिणाम होता कामा नये.
आज, सोशल मीडियामुळे ही भावना येणे खूप सोपे झाले आहे. सोशल मीडियाचा उपयोग स्वत:ला मनस्ताप न करुन घेता कसा करता हे ज्याचं त्यानं ठरवावं.
शेवटी मी एवढेच म्हणेन, जिथे आत्मविश्वास आहे तिथे न्यूनगंडासाठी जागा नाही आणि जे मन न्यूनत्वेने पीडित आहे त्यावर आत्मविश्वासाखेरीज दूसरे औषध नाही.

Comments
Post a Comment