जीवनार्थ देणारी ज्योत


दिस मावळू दे, नवा दिस येईल ग 
तू निज ह्या आशेच्या कुशीत, तुझाही एक दिस येईल ग. 

आपण रोज कुठली ना कुठली प्रेरणा घेऊनच नव्या दिवसाचा सूर्य पाहत असतोकधी कळत तर कधी नकळत, काही गोष्टींच्या प्राप्तीसाठी किंवा काही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित होत असतोमानसशास्त्रात दोन प्रकारच्या प्रेरणा सांगितल्या आहेत: आंतरिक आणि बाह्य. आता आंतरिक आणि बाह्य रुपी प्रेरणांमध्ये काय फरक आहे, ते पाहूया. 
आंतरिक प्रेरणेचा उगम स्वतःच्या आत होतो. ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे माणूस कुठल्याही बाह्य स्वरूपाच्या चैनी वस्तूंची ईच्छा ना बाळगता, आत्मसमाधानसाठी अथक प्रयत्न करतो. तर दुसरीकडे बाह्य प्रेरणा आपल्या परिसरातून उत्त्पन्न होते जसे आपले मित्र मंडळ, आपल्या घरची परिस्थिती किंवा आपल्या समाजातली परिस्थिती. उदाहरण द्यायचं झालं तरआपल्याला अनेकदा गरीब घरातील मुलं परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेले दिसतात. स्वतः मेहनत करून, कष्ट करून, ते आपल्या घरची परिस्थिती सुधारतात. घरी प्रतिकूल परिस्थिती नसताना सुद्धा स्वतः प्रेरित होणे, ही आंतरिक प्रेरणा आहेपरिस्थितीशी दोन हाथ करत असतांना, माणसाला आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रेरणांची साथ लागतेउदाहणार्थ, घरी पैश्यांची टंचाई, सुखसोईंचा अभाव, हे समझून स्वतः जवाबदारीने अभ्यास करून परिस्थिती बदलायचं प्रयत्न  करणारे मुलं ह्या दोन्ही शक्त्य आत्मसात करूनच पुढे जातात. एकूण काय तर कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी या दोन्ही प्रेरणांचं सोबत काम करणं अतिशय आवश्यक आहे. एकाच नाण्याच्या जणू या दोन बाजू आहेत
प्रतिकूलतेवर मात करून स्वतःची ओळख स्थापित करणारे कमळ 
आपल्याला  एकदा तरी असे मुलं  निदर्शनास आले असतील जे घरी TV चा जोरदार आवाज असताना देखील अभ्यास करतात आणि एवढच नव्हे तर अव्वल नंबर ने पास देखील होतात. ह्या पोरांमध्ये केवळ एकनिष्ठता आणि चिकाटीच नसते तर आंतरिक प्रेरणेचा प्रभाव सर्वाधिक असतो. ही  मुलं बाह्य प्रतिकूलतेवर मात करून आंतरिक प्रेरणेच्या बळावर यशस्वी होतात आणि स्वतःला सिद्ध करतात. आपल्याला माहिती आहे चिखलात कमळ येतं. पण हे समजून घेतलं पाहिजे की चिखलात कमळ येण्याचं कारण असं की त्या कमळाला वरती येऊन हे साध्य करायचं असतं की चिखलात कमळ येऊ शकतं (प्रेरणेची जाणीव असल्यामुळे, ध्येय पूर्तीकडे वाटचाल करतो). म्हणजेच काय, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्याला चिखलाची गरज आहे असं नाही, पण चिखल असून देखील तो दाखवून देऊ इच्छितो की चिखलात कमळ येऊ शकतं. अर्थातवाईट परिस्थितीतून चांगले शेवट किंवा चांगला परिणाम हा दिसू शकतो जर आपली आंतरिक  प्रेरणा बळकट असेल तर. ती आंतरिक प्रेरणेची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. परिस्थितीचं काय, परिस्थिती रोज बदलत असतेपण त्या परिस्थितीत स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट करूनआपल्याला यशाचे शिखर गाठायचेच आहे हा विचार मनात कायम ठेवणं, हे केवळ आपल्या हातात असतं. बाहेरचे लोक लाख विनवण्या करतील, डोकं फोडतील, हात-पाय जोडतील, पण जर एका व्यक्तीला मनातूनच काही करायची इच्छा नसेल तर अशा कुठल्याही बाह्य पुढाकाराचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि दुसरीकडेजर एका व्यक्तीला काहीतरी साध्य करायचं असेल पण तो कुठेतरी अडखळत किंवा संकोच करत असेल तर एक छोटंसं बाह्य प्रेरणास्रोत देखील त्याला ते कार्य संपन्न करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो आणि तो यशस्वीदेखील होऊ शकतो
जिद्द ही देखील आंतरिक प्रेरणेतूनच उत्पन्न होते. म्हणजे चिकाटीने एका ध्येयाकडे वाटचाल करणे ही भावना आंतरिक प्रेरणेतूनच यते आणि आंतरिक प्रेरणेमुळेच कायम राहतेयाच प्रेरणेमुळे आपण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकतो. आंतरिक प्रेरणेचे असे अनेक फायदे आहेत. त्यातलंच एक म्हणजे यश प्राप्ती आणि दुसरं म्हणजे नकारात्मक किंवा वाईट विचारांवर सकारात्मकतेचा विजय. कधी निरखून पाहिल्यास आपल्याला हे लक्ष्यात येऊ शकते की जेव्हा आपण एकाग्रतेने कुठलं काम करत असतो, जिद्दीने एका ध्येयाकडे वाटचाल करत असतो, तेव्हा कुठल्याही नकारात्मक विचारांचा आपल्यावर प्रभाव होत नाही. आपण सकारात्मकता अंगीकृत करत असतो, आपल्याच नकळत. "तु जे हाती घेतलंय ते फार कठीण काम आहे बरं का!" "तुला अनेक अडथळ्यांना सामोरी जावे लागले." "ही वाटते तेवढी सोपी नाही बरं का!...", अशा अनेक निरुत्साही करणाऱ्या प्रश्नांना/टीका-टिप्पण्यांनाआपण द्येयाकडे चिकाटीने वाटचाल करतांनाआपल्याच नकळत, दुर्लक्ष करत असतो
अडथळ्यांची जाणीव ठेवणे ही वेगळी गोष्ट आणि त्यांची भीती बाळगणे ही दुसरी. त्यांची भीती बाळगून कधी त्यांना सामोरी जाता येत नाही तेच दुसरीकडे त्यांची जाणीव असली तर आपण ते पार करण्यासाठी उपाययोजना आखू शकतो. ही शक्ती आणि सकारात्मकता आंतरिक प्रेरणेतूनच येते आणि म्हणूनच एक प्रवृत्त व्यक्ती सगळ्या अडथळ्यांचा सामना करण्यायोग्य असतो, मानसिक आणि शारीरिक कष्टांना विचारात घेऊन. 
आंतरिक प्रेरणेचं महत्त्व आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहज दिसू शकते. घरचेच उदाहरण द्यायचे तर मी असे म्हणेन की सध्याच्या या कोरोना मुळे आलेल्या होम क्वारंटाईन च्या काळात, सगळ्यांनाच घरी बसून कंटाळा आलेला आहेत्यात घरकाम करणाऱ्या बाया येत नसल्यामुळे सगळ्या कामांची जवाबदारी घरातल्या व्यक्तींवर आलेली आहेएरवी घरकाम करणाऱ्या बाया असल्यामुळे आपल्यावर कधी भांडी घासायची किंवा फरशी पुसायची वेळ आलेल्या मुली/मुलं देखील आज त्यांच्या आईला  हे सगळे काम करायला मदत करत आहेत. आता हे का म्हणून
यात देखील आंतरिक आणि बाह्य प्रेरणेचे उदाहरण पाहायला मिळू शकते. बाह्य प्रेरणा अशी की घरी काम करणाऱ्या बाया नसल्यामुळे आपल्या आईवर कामाचं ताण वाढतच आहे आणि म्हणून आपण तिला हातभार देऊन केवळ तिचं काम हलकं करू शकतो पण नवनवीन गोष्टी, ज्या इतर वेळी शिकायला पुरेसा वेळ मिळत नाही, त्या देखील शिकू शकतो (जसे पोळ्या करणेचमचमीत पदार्थ करून पाहणे, घरकामाची सवय करून घेणे, इत्त्यादी.). आणि आंतरिक प्रेरणा अशी की आई प्रति आपल्याला वाटणारं  प्रेम, सहानुभूती, आणि काळजीया सगळ्या पोटी आपण ते कष्ट वाटून घेण्याची इच्छा मनात बाळगतो. भांडी घासून हात-पाय दुखतील ह्याची कल्पना असून देखील जेव्हा आपण आपल्या घरच्यांची मदत करण्याचे निर्णय घेतो, त्या वेळी आपली आंतरिक प्रेरणा आपल्याला निर्देश करत असते.  
अशाप्रकारे आंतरिक प्रेरणा ही खूप मोठी गोष्ट नसली तरी तिचा प्रभाव मात्र असामान्य होऊ शकतो आणि हा प्रभाव आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सहज अनुभवू शकतो. अशा प्रकारे आपली आंतरिक बाह्य प्रेरणा आपल्या आयुष्याला एक नवं वळण आणि एक नवा अर्थ सतत देत असते जे आपण सहज निरिक्षुन पाहू शकते.

Comments

Popular Posts