कोरी पानं
कोरी पानं म्हणजे जणू एक सुरवातच, नाही का? नव्या अनुभवांची किंवा नव्या नात्यांची. अश्या अनेक कोऱ्या पानांना आपल्याला कधी ना कधी सामोरी जावं लागतं. उत्तम लेखक देखील कोरी पानं बघून स्तब्ध होतात. अनेकदा डोक्यात विचारांचा कल्लोळ होऊनही पानं मात्र कोरीच राहतात. अशा वेळी हिमतीने पाहिलं अक्षर लिहिण्यात च हुशारी असते. तसेच कुठलही नवीन काम हातात घेतांना संकोचणे सहाजिक आहे ,पण पहिलं पाऊल पुढे टाकणाराच यशस्वी होतो हे देखील तितकेच सत्य आहे.
आठवून बघा, पहिल्यांदा शाळेत जाताना, गाडी शिकायची असताना, नवीन नाती जुळवताना, आपलं पाहिलं पाऊलच आपल्याला यशाकडे घेऊन आलंय. अविस्मरणीय आठवणींची पुरवणी म्हणा हवं तर, पण पहिलं पाऊल हे नेहमीच महत्वपूर्ण ठरतं. शिवाय, कोणीतरी म्हणूनच गेलाय ना "There is always a first time for everything". मग का कू कशाला करायचा? करा बिंदास सुरवात!
सुरवात केली की पुढचा प्रवास आपसूकच सोपा होत जातो. या खेरीज, जरी कुठली सुरवात करतांना हुरहूर लागते, तरी देखील ते काम सतत सात्यत्याने करत राहण्यात एक वेगळीच गोडी अनुभवास येऊ शकते. पण तो पुढचा भाग आहे, प्राथमिक पातळीवर प्रयत्न करणेच महत्वाचे आहे.
आपल्या अवती भवती असे अनेक लोक आहेत ज्यांना कधीतरी काहीतरी करायचं होतं पण काही कारणविशेष वेळ मिळाला नसावा, मार्गदर्शन मिळालं नसावं, सहायता मिळाली नसावी किंवा कोणी पाठीवर हात ठेऊन आधार देणारं नसावं. असे असले तरी, सध्याच्या काळात आपण त्या सगळ्या पण-परंतुंना बाजूला सरून, न करता आलेल्या गोष्टी करायला हव्या आणि आयुष्यातल्या त्या कोर्या पानांवर त्यांचे अनुभव सजवायला हवे.
मी स्वतः बारावी नंतर कधी Maths, Logic, अशा कुठल्याही विषयांना हात लावलेला नव्हता. आणि Computer software असो किंवा त्या निगडित इतर काही तांत्रिक गोष्टी असो, त्या सगळ्याच बाबींशी माझा छत्तीसचा आकडा होता. पण, या Quarantine च्या काळात मी HTML coding शिकायला सुरुवात केली. अर्थात, हा एक निखळ प्रयत्न आहे नवीन गोष्टी जाणून घेण्याचा, आणि माझ्या आयुष्यातलं एक कोरं पान ह्या अनुभवाने रंगवण्याचा. आणि गंमत म्हणजे मला कोडींग करताना मजा सुद्धा येते! मग आता विचार करून पहा अशा किती गोष्टी असतील जे "आपल्याला नाही जमणार बाबा !" "मला नाही आवडत बुवा!", असं म्हणून आपण सोडून दिल्या असतील? केल्याशिवाय कळणार कसं, आवडतं, की नाही आवडत म्हणून? इतरांच्या अनुभवावरून तर नाही ठरवता नाही येणार ना.
माझं सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही देखील निरीक्षण करून बघा, आणि जर अशा कुठल्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला करता आल्या नाही किंवा तुम्ही कधी करून पहिल्या नाही, तर त्या सगळ्या गोष्टी अवश्य करून पहा, आणि आयुष्यातल्या त्या कोर्या पानांवर यांचे अनुभव रेखाटून ठेवा. आयुष्याच्या पूस्तकाचे हेच पानं पुढे जगण्याला एक नवी उमीद देऊ शकतात. आपल्या चेहऱ्यावर आपसूकच हसू फुलवू शकतात.
मला माहितेय कोणीतरी लागतं, उत्साह वाढवणारं, पाठीवर हाथ ठेऊन लढ नाही, पण निदान कर म्हणून सांगणारं. जर तुमच्या अवती भवती असलेली मंडळी कामात गुंतलेली असेल, तर मी अशा करते की माझ्या पेरलेल्या शब्द सुमनांमधून तुम्हाला प्रोत्साहानेचा सुगंध येईल!
आयुष्यातले कोरे पानं रंगवणार ना मग?
नक्की कळवा!



Fascinating post!
ReplyDeleteGlad you like it!
DeleteKhupach sundar👌👌
ReplyDeleteKhup Khup Dhanyawaad!
Delete